Pune – येवलेवाडी येथील ज्वेलर्स दूकानातील कामगाराची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी चौघांना बिहारमधून अटक

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दूकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपींना पोलीसांनी अथक परिश्रम घेऊन बिहार राज्यातून अटक केली आहे.गोळीबाराची ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.21 नोव्हेंबरला) दुपारी पावणे दोनच्या सूमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दूकानात घडली होती.

कुंदन विजय सिंग (वय 23), अमित विजय सिंग(वय 20), रिशु संजय सिंग(वय 21), विकास सुरेश सिंग(वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरत परिहार(वय 25, रा.मूळगाव राजस्थान) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्सचे या दूकानाचे मालक मालमसिंग देवडा बाहेरगावी गेले होते, त्यांच्या दूकानात अमरत हा गेल्या चार वर्षांपासून कामास होता. तो दूकानात एकटाच होता. नेहमीप्रमाणे तो दूकानात आपले काम करत असताना दूपारी अचानक चारजण तेथे आले आणि त्यांचे अमरतशी काही बोलणे झाले. दरम्यान चार जणांपैकी तोंडाला बांधलेल्या एकाने बंदूकीतील गोळी अमरतवर झाडली. त्यानंतर चारही आरोपी तेथून पसार झाले. हल्ल्यानंतर ते कात्रजच्या दिशेने पळून गेले. झालेल्या गोळीबारात अमरतच्या पोटाला गोळी लागल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला होता . उपचारादरम्यान त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला.

आरोपींनी हा गुन्हा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केला होता. गोळीबाराच्या 6 दिवसांपूर्वी हडपसर आणि कोंढवा येथून 5 दूचाकी चोरल्या होत्या. त्यांनी त्या दूचाकींचा वापर गोळीबाराच्या दिवशी केला होता. कोणालाही याबाबत सुगावा लागू नये म्हणून त्या दूचाकी एका डोंगराच्या बाजूला सोडून ते पसार झाले होते. पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज च्या मदतीने त्या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यानंतर पोलीसांनी अथक परिश्रम घेऊन या गुन्ह्यातील बिहार राज्यातील आरोपींच्या घरांवर रात्री छापे घालून चार आरोपींना जेरबंद केले. तर यातील फरार आरोपी रवि सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.