Pune : मधुमेह व मन या विषयावर मंगळवारी डायबेटीस स्वमदत गट

एमपीसी न्यूज- ‘मधुमेह आणि मन’ हा मधुमेह व मानसिकता यांच्यातले नाते विषद करणारा कार्यक्रम आयपीएच व केईएम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 30) संध्याकाळी 6 ते 8 मधुस्नेह डायबेटीस स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

डायबेटीस हा शरीराचा आजार असला तरी, या आजाराचा व आजारी व्यक्तीच्या मानसिकतेचा खूप जवळचा संबंध आहे. मानसिक ताणतणाव हा या आजाराला कारणीभूत ठरणारा एक महत्वाचा घटक आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर मनात ‘मलाच का?’, ‘आता काय काय करावे लागणार हा आटोक्यात ठेवण्यासाठी?’ असे अनेक प्रश्न मनात उभे रहातात व कधीकधी त्यातून भावनेचा उद्रेक होतो. मोठ्या काळासाठी औषधोपचाराला सामोरे जावयाचे असल्याने, त्यासाठी मानसिक तयारीही करावी लागते.

एकदा औषधोपचार सुरु झाले की डॉक्टर जीवनशैलीतले बदलही करायला सांगतात. हे बदल करण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबर, भावनेचे बळही लागते.
डायबेटिक व्यक्तीची मानसिकता या आजाराच्या व्यवस्थापनामधे महत्वाची भूमिका बजावत असल्याने, ‘मधुमेह आणि मन’ हा मधुमेह व मानसिकता यांच्यातले नाते या स्वमदत गटातून विशद होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. व्ही. एस्, आजगावकर (ज्येष्ठ मधुमेहतज्ञ), डॉ. सी. एस्. याज्ञिक(मधुमेहतज्ञ) व डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकासतज्ञ) मार्गदर्शन करतील.

हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे या ठिकाणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.