Pune : वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स, ऍग्री एक्सपोतर्फे बालेवाडी येथे शुक्रवारपासून देशी गाईचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज- वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स, ऍग्री एक्सपोतर्फे शुक्रवारपासून बालेवाडी येथे देशी गायीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोपालक व गोप्रेमींसाठी ही पर्वणी असून या प्रदर्शनात अनेक राज्यामधील वेगवेगळ्या देशीगायी एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान, साई चौक बालेवाडी रोड, ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेजसमोर भरवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे याठिकाणी बकरी इतक्या उंचीची पागनूर जातीची गाय पाहायला मिळणार आहे. शिवाय गायीविषयी वैज्ञानिक माहिती, गोपालन विषयी माहिती दालन, गाय आणि शेती विशेष माहिती दालन, गाय आणि आरोग्य विषयक माहिती, राष्ट्रीय कामधेनु आयोग याबद्दल माहिती, अमेरिकन तज्ञाद्वारे मार्गदर्शन,गायीच्या उत्तमवाणांची निवड व पैदास, नवीन तंत्रज्ञान व त्याचा वापर या विषयी माहिती, चारा पिके महत्व व उत्पादन अशी महत्वाची माहिती मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.