Pune : जागतिक महिला दिनी कचरा वेचक महिलांचा सत्कार; महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचा उपक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनी कचरा वेचक, कष्टकरी महिलांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला.

प्रतिष्ठानच्या प्रमुख उत्कर्षा शेळके यांनी महिला दिनाचा आनंद वंचित महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केला. कष्टकरी, कचरा वेचक महिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन हा सन्मान करण्यात आला. सकाळी 8 ते ११ या वेळेत हा उपक्रम पार पडला.

पिंपळे गुरव प्रभाग २९ चे मुकादम राजू ओव्हाळ यावेळी उपस्थित होते. कमल हनुमंत कांबळे ,लक्ष्मी खंडागळे,मीना कांबळे ,मल्लम्मा साऊर ,रेखा केम्भार, मंदा चौहान ,सुंदर आल्हाट ,सारिका शेळके ,मालती वाघमारे,कमल कैलास कांबळे आदी कचरा वेचक महिला यावेळी उपस्थित होत्या.

टिळक रस्ता, पुणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील उद्यानातील उद्यानरक्षक महिलांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.