Pune : चिंताजनक ! पुण्यात 24 तासांत 65 कोरोना पॉझिटिव्ह; 5 मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणेकरांची चिंता वाढविणारी बातमी हाती आली आहे. पुणे शहरात गेल्या 24  तासांत एकूण 65 रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंतचा पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. यामध्ये काल (बुधवारी) रात्री एका वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून, आज 4  जणांचा बळी गेला आहे.

पुणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी ही माहिती दिली. नायडू रुग्णालयात 265  कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. त्यातील 163  जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 7 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या 796 पथकांनी शहरातील विविध भागात 27,98, 651 नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी 8,44, 189  घरांपर्यंत हे पथक पोहोचले.

दिवसभरात एकूण 65  रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ससून रुग्णालयातील 5,  पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील 57 आणि खासगी रुग्णालयातील 3  रुग्णांचा समावेश आहे. तर प्रकृती गंभीर असलेले 4  रुग्ण ससूनमध्ये उपचार घेत असून, अन्य 3  रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.