Pune : सोनिया पाटील ‘वॉव पर्सनॅलिटी पुरस्कार’ ने सन्मानित

एमपीसी न्यूज- सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा ‘ब्लिस इक्विटी प्रकाशन’तर्फे सन्मान करण्यात आला. यात सोनिया पाटील (पुणे) यांना ‘महाराष्ट्राचा गौरव – वॉव पर्सनॅलिटी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोनिया पाटील यांना प्रसिद्ध अभिनेत्री शांतीप्रिता आणि लेखक व अभिनेत्री नंदिता पुरी (अभिनेता ओम पुरी यांच्या पत्नी) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम मंगळवार, दि. 18 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी माणिक सभागृह, बांद्रा, मुंबई येथे झाला.

या कार्यक्रमाला टेलिव्हिजन कलाकार काम्या पंजाबी, अभिनेत्री देलनाझ इराणी, अभिनेत्री नंदिता पुरी, युवा लेखक ऱ्हिदम वाघोलीकर (क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ स्वयंसेवी सेवी संस्थेचे संस्थापक), विकास गुप्ता ( कलाकार ), रोहित वर्मा ( फॅशन डिझायनर) आणि सब्यासाची मूखर्जी (फॅशन डिझायनर) तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलताना नदीत पुरी म्हणाल्या, ‘ सोनिया पाटील या महाराष्ट्राच्या सन्मानार्थ पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून, माझ्याकडून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. ‘

सोनिया पाटील या सामाजिक कार्यकर्त्या असून, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमच्या मदतीसाठी सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौविण्यात आले. तसेच दिल्लीतील ‘फेस ऑफ महाराष्ट्र 2018’ च्या विजेत्या असून त्या उद्योजकदेखील आहेत. त्या एक आंतरराष्ट्रीय हॉटेलियर, लेखक, परोपकारी, व्यावसायिक स्त्री, सामाजिक कार्यकर्ता, प्राणी कार्यकर्ता आणि सुपर मॉडेल अशा क्षेत्रात कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.