Pune News : लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास! पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू 

एमपीसी न्यूज : पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (Pune News)  (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे आज आकस्मित निधन झाले. आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही घटना घडली. स्वप्नील पाडाळे (31) असे पैलवनाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्ती साठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक व्यायाम करताना खाली पडला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Chinchwad News : साईनाथ बालक मंदिराचा 51 वा वर्धापन दिन साजरा

अधिक माहितीनुसार, स्वप्नील ने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. (Pune News)  स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.