Pune : मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर येवलेवाडी विकास आराखडा मंजूर

एमपीसी न्यूज- महापालिकेत समाविष्ट झालेल्या येवलेवाडीच्या विकास आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी रात्री उशिराने मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी अनेक आरोप करत भाजपवर टीका केल्याने रात्री उशीरापर्यंत ही सभा सुरू होती. विकास आराखड्याचा विषय तीन वेळा पुढे ढकलल्या नंतर तो मंगळवारी सभेसमोर समोर चर्चेसाठी आला. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना, मनसे, यांनी त्यावर मोर्चेबांधणी केली होती.

मात्र, स्पष्ट बहुमत असल्यामुळे सत्ताधारी भाजप निवांत होते. मनसेने या आराखड्यात आमदार योगेश टिळेकर यांना मर्सिडीज कार मिळाल्याचा थेट आरोप करून धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे हा विषय अधिकच संवेदनशील झाला होता. त्यामुळे कोंडीत पकडले गेलेल्या भाजपने चार पावले मागे येत नियोजन समितीने मंजूर केलेल्या आराखडा स्पष्टपणे फेटाळून लावला व शहर सुधारणा समितीने मान्य केलेल्या आराखड्याला मंजुरी दिली.

मात्र स्वतःचेच सदस्य असलेल्या नियोजन समितीने केलेल्या शिफारशी रद्द करण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर ओढावली आहे. याला एकमेव कारण म्हणजे आमदार योगेश टिळेकर यांची मर्सडीज कार’ विकास आराखड्याला भोवली अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.