Pune : महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलमध्ये योग कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून (Pune) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कार्यरत महिला सेविकांसाठी योग कार्यशाळा परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील ट्रेनिंग हॉल येथे नुकतीच घेण्यात आली.

या योग कार्यशाळेत महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष कांचन भोसले यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी महामंडळाच्या कंपनी सेक्रेटरी निता भरमकर व कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे उपस्थित होते.

महामंडळाकडील कार्यरत महिला सेविकांनी या योग कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यावेळी प्रशिक्षक कांचन भोसले यांनी अष्टांग योग मार्गदर्शन, महिलांच्या आरोग्य विषयक समस्या तसेच मासिक पाळी सबंधी माहिती, समज आणि गैरसमज या विषयांवर महिला सेविकांना मार्गदर्शन केले.

Pimpri : सहा डुकरांना क्रुरपणे जाळल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.