Pune : योग उर्जा संस्थेतर्फे जानेवारी महिन्यात ‘योग रीट्रीट’शिबिर

एमपीसी न्यूज- व्यस्त शहरी धकाधकीच्या जीवनामधून आपल्या शारीरिक मानसिकतेला ऊर्जा देण्यासाठी योगाभ्यासाची नितांत आवश्यकता असते. या हेतूनेच योग उर्जा या संस्थेने 18 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये पानशेतजवळील एका निसर्गरम्य ठिकाणी योग रीट्रीटचे आयोजन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या पानशेतजवळील एका निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आसने, प्राणायम शुद्ध क्रिया, मेडिटेशन असे अनेक योग सत्र घेण्यात येणार आहेत. यासाठी मार्गदर्शक म्हणून अनुभवी तज्ञ योग प्रशिक्षकांकडून याविषयीचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. योग आणि आयुर्वेद या शास्त्रातील एका नामवंत डॉक्टरचे मार्गदर्शन व्याख्यान देखील होणार आहे.

हा योग वर्ग तीन दिवस चालणार असून उत्तम निवास व्यवस्था, सात्विक शाकाहारी आहार यासह अत्यंत अल्प प्रमाणात शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी योग उर्जा संस्थापक देवयानी यांनी 7798930608 या क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय www.yogaurja.com या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.