Pune : ‘योगेश ज्वेलर्स’चे मालक नंदलाल वर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे कॅम्प भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्ट्रीट (सेंटर स्ट्रीट) येथील ‘योगेश ज्वेलर्स’चे मालक नंदलाल छगनलाल वर्मा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व पंतवंडे असा परिवार आहे. शिंपी आळीमधील श्रीपाद तरुण मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.

भरतकुमार ज्वेलर्स आणि सिल्वरचे मालक भरतकुमार ब्रिजलाल वर्मा यांचे ते थोरले बंधू होत. ते जनसंघाचे पुणे शहरामध्ये संस्थापक-सदस्य होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेवरवर देखील काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.