Pune : योगीराज भाऊमहाराज परांडे यांना दिल्ली येथे बाबा आमटे शांती भूषण पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज : दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाच्या (Pune) सुरेख समन्वयातून समाजसेवा समाजप्रबोधन अंधश्रद्धा निर्मुलन व्यसनमुक्ती व वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचे व्रत घेतलेल्या राष्ट्रसंतश्री प.पु. योगीराज भाऊमहाराज परांडे (संस्थापक श्रीदत्त आश्रम मारणेवाडी पुणे व कर्मयोग प्रतिष्ठाण धनकवडी, पुणे तथा अध्यक्ष क्षत्रीय मराठा वारकरी दिंडी संस्था मर्यादित) यांना राजधानी दिल्ली येथे इंडिया इस्लामिक कल्चरल आॅडिटोरिअम येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात बाबा आमटे शांती भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

भारतीय सामाजिक पर्यटन विकास परिषद व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व न्यू जर्नी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाबा आमटे शांती भूषण पुरस्कार वितरण व नॅशनल बलिदान अवार्ड 2023 चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाम जाजु  (उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी) यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या शिवाय नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन.पठाण, संजय कुमार सैन पोलिस उपायुक्त दरियागंज दिल्ली, धरमपाल भारद्वाज (चिफ फायर आॅफिसर दिल्ली), व सैन्यदलातील अनेक माजी अधिकारी उपस्थित होते.

Vadgaon Maval : अपंग कल्याण निधीतून दिव्यांग बांधवांना चार लाख दहा हजार रुपये निधीचे वाटप

पुरस्कार वितरणापूर्वी भाऊंच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. आंतरभारती शिक्षण संस्थेचे उमाजी भिषण यांनी भाऊंच्या दत्तसेवेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन व जनसामान्यांना सुलभ व सोप्या मार्गाने अध्यात्म मार्गदर्शनाच्या कार्याचा गौरव केला.

केवळ पुण्यातच किमान 25000 हुन अधिक अनुयायी भाऊंच्या मार्गदर्शनाखी (Pune) वारकरी संप्रदाय व दत्तसंप्रादायाच्या सेवेत आहेत व महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर भाऊंचे अनुयायी आहेत याचे कौतुक केले. पुण्यातील वारकरी संप्रदायात भाऊंना हा पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.