Pune : आपण कोरोना विषाणूवर मात करणारच -शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये नागरिक, विविध संस्था, संघटना सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूवर आपण मात करणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

प्रदूर्भावाच्या कारणे व पार्श्वभूमी विचारात घेता शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना सर्वानीच पालन करणे, तोंडाला रुमाल, मास्क लावणे, शासन निर्देशानुसार सूचनांचे पालन करीत संचारबंदी काळात घरीच बसने, सुरक्षित रहाणे, इतरांची काळजी घेणे, सामूहिक अशा प्रकारे लढा दिल्यास कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करता येईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

मनपा आयुक्त कार्यालयात आलेल्या संस्था संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी विविध उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात पुणे महापालिका नियोजनबद्ध यशस्वी लढा देत आहे. मनपा रुग्णालयात नेमक्या कोणत्या व आवश्यक साहित्याची गरज आहे याची यादी केली.

या साहित्याची खरेदी मदत स्वरूपात मिळणाऱ्या अर्थ साहाय्याने घेणे अशी कल्पना होती. परंतु, याप्रक्रियेत अधिक सोपस्कारामुळे वेळ दवडण्यापेक्षा ज्या व्यक्ती, संस्था अणि सामाजिक उत्तरदायित्ववाच्या सीएसआर (CSR) अंतर्गत मदत देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना सांगितले की, धनादेश देण्याऐवजी तेवढ्याच रकमेस अनुसरून संबंधित व्यक्ती व संस्थानी मनपाच्या आरोग्य विभागाकडील यादी पाहून साहित्य, उपकरणे परस्पर खरेदी करून द्यावीत, असे सूचित केले.

कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह नेण्यास व अंत्यविधी बाबत नकार दिला, अशा परिस्थितीत शासनाचे निर्देशानुसार पुणे मनपा आपल्या स्तरावर अंत्यविधी करेल. अशा परिस्थितीत काही मुस्लिम सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मदतीकरिता पुढे आले. ही चांगली बाब असल्याचे आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.