Pune : प्रेमभंगातून चिडलेल्या प्रियकराने केला प्रेयसीच्या वसतिगृहात गोळीबार

एमपीसी न्यूज- प्रेमभंग झाल्यामुळे बिथरलेल्या प्रियकराने प्रेयसी राहत असलेल्या वसतिगृहात जाऊन हवेत गोळीबार केला. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात सोमवारी (दि. 4) रात्री घडला.

सुरज सोनी (वय 23) असे यातील प्रियकराचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे. आज सकाळी बालेवाडी परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात हा प्रकार घडला.

प्रेयसी रहात असलेल्या वसतिगृहात हा प्रियकर शिरला आणि त्याने तिच्यशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने जवळील पिस्तुलातून हवेत तीनवेळा गोळीबार केला. दरम्यान गोळीबाराच्या आवाजाने हॉस्टेलमधील इतर मुली जाग्या झाल्या आणि काय झाले ते पाहण्यासाठी बाहेर आल्या. यावेळी त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे सुरज सोनी याला चांगलाच मार लागला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास चतुःशृंगी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.