Pune : प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार; खोलीत आढळला तरुणीचा मृतदेह

एमपीसी न्यूज- प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे परिसरातून उघडकीस आली आहे. या तरुणीचा मृतदेह एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

सोनाली भिंगारदिवे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. चार ते पाच दिवसांपासून ती बेपत्ता होती. बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. सोनाली ही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तर तिचा खून करून प्रियकर सोमेश घोडके हा फरार झाला आहे.

नऱ्हे येथील झील कॉलेजमध्ये सोनाली शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वीच तिने कॉलेजजवळ भाड्याने खोली घेतली होती. या खोलीमध्ये संशयित सोमेश घोडके व सोनाली एकत्र राहत होते. दरम्यान या दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने सोनालीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोमेशने चिठ्ठी लिहून ठवली आहे. त्यामध्ये मी मी स्वतः ही आत्महत्या करणार असल्याचे त्यात त्याने नमूद केले आहे.

सोनालीचा मृतदेह कुजला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनालीचा खून साधरणत: तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.