Pune: प्रेमप्रकरणातून तरुणीचा ओढणीने गळा आवळून खून

एमएमपीसी न्यूज – प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीचा मृतदेह लोहगाव येथील एका झाडीमध्ये बुधवारी (दि.26) संध्याकाळी आढळून आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उमा बबन चापटे (वय 20, रा. खराडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी परमेश्वर बोयाने (वय 23, रा. बोराडे वस्ती) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी लोहगाव परिसरात झाडीमध्ये स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विमानतळ पोलीस घटनास्थळी पोहचले. प्राथमिक तपासानंतर या तरुणीचा खून ओढणीने गळा आवळून केला असल्याचे निष्पन्न झाले. तपासानंतर तिचा खून तिच्या प्रियकराने केल्याचे समोर आले.

आरोपीने तरुणीला गोड बोलून भेटायला बोलावले. ती आल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाले. त्या वादातून त्याने तिला झाडीत नेऊन तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.