Alandi : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक (Alandi ) अत्याचार करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत आळंदी येथे घडला होता.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अमित अंकुश इंगोले (वय 21 रा. दिघी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Kiwale : फुकट कपड्यांची मागणी करत कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती कपडे व रोख रक्कम घेतली हिसकावून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 17 वर्षाची आहे हे माहिती असून देखील आरोपीने तिच्यावर दोनवेळा लैगिंक अत्याचार केले. यामुळे फिर्यादी यांची मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यावरून दिघी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बाललैंगिक आत्याचाराचा गुन्हा  दाखल करण्यात आला (Alandi ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.