Pune : पुण्यातील गिर्यारोहकांनी माऊंट युमान शिखरावर साजरा केला स्वातंत्र्यदिन

पुण्यात येताच महापौरांनी केले स्वागत

एमपीसी न्यूज – पुण्यातील तरुणांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माऊंट एव्हरेस्ट शृंखलेतील माऊंट युनाम शिखरावर (20100 फूट) स्वातंत्र्य दिन साजरा करून एक नवा इतिहास केला आहे. पुण्यामध्ये या तरुणांचे स्वागत आणि अभिनंदन महापौर मुक्ताताई टिळक यांनी केले

हिमालयातील माऊंट युनाम (20100) फूट उंचीचे शिखर सर करण्याचा अनोखा विक्रम पुण्यातील 10 जणांच्या ग्रुपने केला.  7 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2018 दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम करून इतिहास स्थापण करण्याचा प्रयत्न करणारी पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था 25 व्या वर्षात पदापर्ण करत आहे. संस्थेतर्फे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती केली जाते. किल्ले तसेच इतर भागांमध्ये झाडे लावून त्यांचे संगोपन करणे त्याचप्रमाणे लिंगाणा, वजीर, हडबीची शेंडी, नवरा नवरी सुळका, कळकराय ह्या सारखे अवघड अवघड सुळके सर करणे अशाप्रकारचे उपक्रम राबवले आहेत

माऊंट युमान पीक या मोहीमेमध्ये सुनिल पिसाळ, प्रशांत अडसुळ, धनराज पिसाळ(मोहिमेचे नेतृत्व), गोपाळ कडेचुर, स्वप्निल गरड (महाराष्ट्र पोलीस), सोमनाथ सोरकादे, सद्गुरू काटकर, अनिकेत बोकिल, अभिजित जोशी, सायली महाराव यांचा समावेश होता. तब्बल 15 दिवसाच्या या मोहिमेत  5 जणांनी हे शिखर पार करून मोहीम यशस्वी केली आहे .त्याबरोबरच 14 फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकवून गिटार वर राष्ट्रगीत 15 ऑगस्ट दिवशी गायिले. या मोहिमेला सुनील पिसाळ यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.