Pune : पोहण्यासाठी आलेला तरुण खडकवासला धरणाच्या कालव्यात बुडाला

एमपीसी न्यूज : खडकवासला धरण परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेला एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. (Pune) रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुबेर इस्माईल शेख हा तरुण पोहण्यासाठी आला होता. पोहत असताना तो अचानक दिसेनासा झाला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे जवान त्याचा शोध घेत आहेत. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुबेर आणि त्याचे तीन मित्र खडकवासला धरणाच्या कालव्यात होण्यासाठी आले होते. मात्र मित्रांना पोहता येत नसल्यामुळे ते काठावर बसून पाहत होते. तर जुबेर पोहण्यासाठी कालव्यात उतरला होता. दरम्यान पोहणारा जुबेर अचानक दिसेनासा झाल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune : कोरेगाव पार्कमधील सेक्स रॅकेट उद्धवस्त; 3 परदेशी तरुणींसह 5 जणींची सुटका 

अग्निशमन दलाच्या जवानांनी जुबेर चा शोध घेण्याचा प्रयत्न केला.(Pune) मात्र कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पाण्याला वेग ही जास्त असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत. बेपत्ता झालेल्या जुबेर चा शोध अद्याप तरी लागला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.