Pune : ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’; कादंबरीचे 16 फेब्रुवारी रोजी प्रकाशन

एमपीसी न्यूज – पुस्तकविश्व प्रकाशन व (Pune) उचित माध्यम पुणे आयोजित आणि एमपीएसी स्टुडंट फोरम वास्तव कट्टा, पुणे यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवर लिखित, रुद्र एन्टरप्रायझेस प्रकाशित ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’ या कादंबरीचे प्रकाशन व ‘स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता’वर परिसवांदाचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ पुणे येथे हा समारंभ होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पाचे संचालक आयएएस कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी सनदी अधिकारी आयएएस महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात उद्योजक रणजितसिंह पाटील, ठाणे पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे आणि डीडी सह्याद्री व आकाशवाणी केंद्राचे संचालक इंद्रजित बागल आपले विचार मांडणार आहेत.

Pimple Gurav : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने वार

‘यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या (Pune) विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, प्रेम, जिद्द, यश-अपयश, भीती, असुरक्षितता या सर्व मनातील भावनांचा तळ तपासून धडपडणाऱ्या तारुण्याची गोष्ट सांगणारी, स्पर्धा परीक्षेत पास न होणारे, निवडले न जाणारे विद्यार्थी प्लॅन बी निवडून दुसऱ्या क्षेत्रात करिअर कसे करतात. त्यांच्या जीवनाचा पट संशोधनात्मकपणे मांडणारी आणि धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगण्यासाठी व नवीन वाटा धुंडाळण्यासाठी महत्वाची ठरलेली ही कादंबरी आहे, असे ज्ञानेश्वर जाधवर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.