Pune Murder: पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या

एमपीसी न्यूज: पुणे शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. कोंढवा परिसरात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. (Pune Murder) महेश गुजर (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Pune Gambling raid: धनकवडीत कुख्यात गुन्हेगाराच्या जुगार अड्यावर छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मयत महेश गुजर याचे काही जणांसोबत किरकोळ वाद झाले होते. याच वादातून चार जणांनी मिळून महेश गुजर याला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याला ठार मारले. (Pune Murder) घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत यातील चार आरोपींना ताब्यात घेतले होते. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.