Pune : लोकशाही सबलीकरणासाठी तरुणांना राज्यघटनेचे ज्ञान आवश्यक – व्हॉईस ॲडमिरल देशपांडे

एमपीसी न्यूज – लोकशाही अधिक मजबूत (Pune) व सबल करायची असेल तर तरुणांनी राज्य घटनेचे ज्ञान घेणे, त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, असे मत व्हॉइस एडमिरल दिनेश देशपांडे यांनी प्रजासत्ताक दिनी (दि.26) व्यक्त केले.

वाकड येथील आय.आय.ई.बी.एम, इंडस बिझिनेस स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी देशपांडे बोलत होते. यावेळी आय.आय.ई.बी.एमचे अध्यक्ष कर्नल (नि) विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, सह अधिष्ठाता डॉ भारती कालिया,डॉ विशाल भोळे, बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांना राज्यघटनेचं ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणात अंमलबजावणी करणे (Pune) आवश्यक आहे. भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Wakad : वाकड येथे सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून पडून पिता-पुत्राचा मृत्यू

तसेच भारत विविध क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून तीस वर्षांपूर्वीच भारत हा नौदलामध्ये आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न झाला. तसाच तो आता संरक्षण क्षेत्रामध्ये ही यशस्वी होत असून तरुणांना भरपूर संधी आहेत. असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. तसेच या दिवशी इंडस बिझनेस स्कूल आणि इंडस चॅम्प्स स्कूल या दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर

कार्यक्रमात यावेळी विजय रन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये इंडस बिझनेस स्कूल व इंडस चॅम्प्स स्कूलच्या विद्यार्थांनी हा कार्यक्रम पार पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.