BNR-HDR-TOP-Mobile

Pune : वकील युवराज ननावरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

647
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे वकिल युवराज ननावरे (वय 50, रा. धनकवडी) यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. ननावरे यांच्या आत्महत्येमुळे वकील वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ननावरे यांचे धनकवडी परिसरातच कार्यालय आहे. सोमवारी दुपारी कार्यालयात कोणी नसताना ननावरे यांनी खुर्चीवर उभे राहून नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला. शेजारच्या नागरिकांना खुर्ची पडल्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता ननावरे यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येमागील कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

ननावरे हे गेल्या 25 वर्षापासुन दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. अत्यंत मनमिळावु स्वभावाचे असलेले ननावरे यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत त्यांच्या जवळच्या मित्रांना देखील माहित नाही. नानावरे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजु शकलेले नाही. ननावरे हे गेल्या 25 वर्षापासुन शिवाजीनगर येथील न्यायालयात सिव्हील प्रॅक्टीस करीत होते. अत्यंत मनमिळावु स्वभावाचे असलेले ननावरे यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत त्यांच्या जवळच्या मित्रांना देखील माहित नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ननावरे यांचे कार्यालयात धनकवडी परिसरात होते. त्यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क होता. ज्येष्ठ वकिलांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. नानावरे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3