Pune News : पुणे जिल्हा परिषदेचा विक्रम ! एका दिवसात बांधले 246 किमीचे रस्ते

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा परिषदेने एकाच दिवसात 240 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. शंभर दिवसात कामे पूर्ण करण्याच्या केल्या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे रस्ते तयार करण्यात आले. यामध्ये एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचे पक्के डांबरीकरण केलेले रस्ते देखील आहेत. 

पुणे जिल्हा परिषदेने एक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये 100 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत रस्ते बांधण्याचा आणि अन्य कामांचा समावेश होता. यामध्ये सुमारे दोन हजार 635 रस्त्यांच्या कामाचा समावेश होता. यातील मंगळवारी या एका दिवसात 682 कामे सुरु झाली. बुधवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत या मोहिमेचा अहवाल सादर करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रत्येक कामामध्ये 25 मीटर डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात मंगळवारी दिवसभरात 246 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यातील एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचे पक्के डांबरीकरण केलेले रस्ते आणि ते 46 किलोमीटर काँक्रिटीकरण आणि 74 किलोमीटर लांबीचे खडीकरण झाले आहे.

यातील सर्वाधिक रस्त्याची कामे हे दौंड, बारामती, आंबेगाव आणि इंदापूर या तालुक्यात झाली आहेत. कोल्हापूर अंदर शिरूर तालुक्यात सर्वाधिक कमी रस्त्यांची कामे झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.