Pune ZP School : पुणे जिल्हा परिषदेच्या 653 शाळांची प्रगती खुंटली; विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीमध्ये घट

एमपीसी न्यूज : पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 653 शाळांमधील (Pune ZP School) विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी कमी असून त्यांच्या वाचन आणि लेखन क्षमतांमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याचे पुणे जिल्हा परिषदेने सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने या शाळांची ‘खराब कामगिरी करणाऱ्या शाळा’ म्हणून वर्गवारी केली आहे.

पुण्यात एकूण 2,40,000 विद्यार्थ्यांसह पुणे जिल्हा परिषदेच्या 3,452 शाळा आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत मिशन किंवा नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी अंतर्गत हे मूल्यांकन केले गेले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना म्हंटले, की “आम्हाला 653 शाळांमधील विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी कमी आहे आणि त्यांच्या वाचन आणि लेखन क्षमतेत कोणतीही सुधारणा होत नाही, असे आढळले. तथापि, काही शाळांमध्ये आम्हाला असे आढळले आहे, की मुलांची शिकण्याची पातळी चांगली आहे आणि त्यांच्या वाचन आणि लेखन कौशल्यांमध्ये सुधारणा झाली आहे.

Pune : पुणे-लोणावळा झाली 45 वर्षांची…लोकलने केला 45 वा वर्धापन दिन साजरा

त्यांनी पुढे सांगितले, की निपुण भारत मिशन अंतर्गत, पुणे जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा आणि संख्याशास्त्राचा पाया सुधारण्यासाठी आठ आठवड्यांची मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. त्यानंतर एका आठवड्यात, आम्ही त्यांच्या वाचन आणि लेखन क्षमतेचे मूल्यांकन केले. मूल्यांकनादरम्यान, आम्हाला 653 शाळांची कामगिरी खराब असल्याचे आढळले.

त्यामुळे आता पुणे जिल्हा परिषदेला या शाळांमध्ये अधिक कठोरपणे लक्ष घालावे लागणार (Pune ZP School) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.