Pune : हडपसरमध्ये जागेच्या वादातून एकावर शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – हडपसरमधील वैदूवाडी झोपडपट्टीत जागेवरून झालेल्या वादातून पितापुत्रांनी एका तरुणावर धारधार शस्त्राने वार केले. संबंधित तरुण यामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

विशाल जाधव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी शुभम खिलारे नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी युवक दोघेही वैदुवाडी झोपडपट्टीमध्ये एकमेकांच्या घराजवळ राहतात. घराजवळ असलेल्या जागेवरून त्यांच्यात भांडण होते.

आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्यात परत एकदा भांडण झाले. यावेळी आरोपी शुभम आणि त्याच्या वडिलांनी विशालला मारहाण केली. आणि शुभमने त्याच्याकडील धारधार शस्त्राने विशालच्य डोक्यावर वार केले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.