Pune : जांभुळवाडी येथील दरीपुलावरून कार कोसळून दोघे जखमी

एमपीसी न्यूज- चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पुणे-सातारा महामार्गावरील जांभुळवाडी येथील दरीपुलावरून तब्बल दिडशे फुट उंचावरुन खाली कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताच्यावेळी कारमधील एअर बॅग तत्काळ उघडल्याने सुदैवाने चालकासह दोघेजण थोड्यात बचावले.

पुणे सातारा रस्त्यावरून एक मारुती नेक्‍सा कार पुण्याच्या दिशेने येत होती. ही कार कात्रज येथील जांभुळवाडीजवळील दरीपुलाजवळ आली असता वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाच्या कठड्यास धडकून दिडशे फुट खोल दरीत खाली कोसळली.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेऊन कारमध्ये असणाऱ्या दोघांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली नाही. अग्निशामक दल व पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत नागरीकांनी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.