Pune corona Update : पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय; आज 1105 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, सोमवारी (दि. 28 सप्टेंबर) तब्बल 1105 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आजही कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 1 लाख 22 हजार 281 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 3 हजार 212 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 779 नवे रुग्ण आढळले. 33 जणांचा मृत्यू झाला. 943 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 520 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 42 हजार 915 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 406 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 228 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा साठा हॉस्पिटलमध्ये पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे.

शहरात सुमारे चार हजार व्हायल्सच्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. रुबी हॉल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर, नोबेल, आदित्य बिर्ला, भारती, सूर्या, पूना हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहेत. जिल्ह्यात बारामती, सासवडसह अन्य ठिकाणीही इजेक्शन उपलब्ध आहेत. या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.