Pune : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीच्या धक्क्यात वृद्धाने गमावले प्राण.

एमपीसी न्यूज :  ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याने मोपेडवरून खाली पडून वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटन काल बुधवारी (दि.12) 7 च्या सुमारास गंगाधाम रोड वरील श्री जी लॉन्स मंगलकार्यालया समोर घडली. सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण अय्यर (वय 62, रा.धरमवीर पार्क, बिबवेवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अजय चव्हाण(वय 24, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे काल त्यांच्या ऍक्टिवा मोपेडवर अय्यर यांच्यासोबत मार्केटयार्ड येथे गंगाधाम रोडने जात होते. दरम्यान मागून एक दुचाकी आली. त्या दुचाकीच्या पाठीमागे एक पोते बांधलेले होते. त्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगात गाडी चालवून फिर्यादीच्या मोपेडला ओव्हर टेक करताना फिर्यादीच्या मोपेडच्या हँडलला धक्का लागला. दरम्यान फिर्यादी गाडीवरून खाली पडले. या अपघातात फिर्यादी आणि त्यांचे साथीदार जखमी झाले. परंतू या अपघातात अय्यर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताला जबाबदार असणारा अज्ञात दुचाकीस्वार तेथे न थांबता पसार झाला.

याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.