Pune : ग्रेट ! कोरोनाला हरवून पुण्यातील 173 पोलीस पुन्हा ड्युटीवर हजर

Great! After defeating Corona, 173 policemen from Pune returned to duty

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात रस्त्यावर अहोरात्र झुंजणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोना बाधित 173 अधिकारी व कर्मचारी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर हजर झाले आहेत.

आतापर्यंत पुणे शहर पोलिस दलातील 236 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात अठरा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दुर्दैवाने यातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात मार्च महिन्यातील लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर अहोरात्र उभे आहेत. पुण्यात एकीकडे कोरोनाचा प्रसार वेगाने होत असतानाच हा संसर्ग टाळण्यासाठी संचार बंदी करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बाहेर रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. परंतु, या संकट काळात सेवा देणाऱ्या अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक अधिकारी नेमला आहे. शिवाय सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी एका सहाय्यक आयुक्तांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर अशा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व वस्तू दिल्या जात आहेत. परंतु, आवश्यक ती काळजी घेऊनही पोलीस दलातील 236 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1