Pune News : पुण्यात लग्नसमारंभ, साखरपुडा यासारख्या कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा शिथील करा

एमपीसी न्यूज – कोरोनाचे निर्बंध संपूर्ण राज्यात बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, दुकाने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळ,बाजार, चित्रपटगृहे, नाट्यगृह सगळेच खुले होत आहे.या पार्श्वभूमीवर  पुण्यात लग्नसमारंभ, साखरपुडा यासारख्या कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा शिथील करावी, अशी मागणी क्रियेटिव्ह फाऊंडेशनच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

सर्वकाही नॉर्मल होत असताना उपस्थितीचे बंधनदेखील शिथिल करणे गरजेचे आहे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला शंभर-दोनशे लोकांच्या उपस्थितीची अट असली तरी कमी उपस्थितीत कार्यालय भाड्यासह भोजनाच्या दरापर्यंत सर्वच महाग पडत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी त्रिसूत्रीच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घालून शुभ कार्यातील संख्यचे बंधन शिथिल करावे, अशी आग्रहाची मागणी फाऊंडेशनच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.