Pune News : पुणेकर काही कमी आहेत का, विदेशी मद्य रिचवण्यात पटकावला पहिला नंबर

एमपीसी न्यूज : मुंबईला कुठल्याही बाबतीत टक्कर देणारे एकच शहर आहे. बरोब्बर. जे तुमच्या मनात आहे. तेच खरं आहे. होय, पुणे शहराने यावेळी विदेशी मद्य रिचवण्यात मुंबईकरांना मागे टाकले आहे. एवढे करूनही पुणेकरांना त्याचा गर्व नाही कारण नको असणारा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. कोरोना काळातही त्यांनी दणकून मद्य रिचवले आहे.

विशेष बाब म्हणजे औरंगाबादकरांनी देखील इतकी मद्य रिचवली की, मद्यातून मिळणाऱ्या महसुलात त्यांनी चक्क मुंबईला मागे टाकलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणेकर मुंबईकरांपेक्षा काही कमी नाहीत, हे याही वर्षी पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 2020 या वर्षभरात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुणेकरांनी 185.24 लाख लिटर विदेशी मद्य रिचवली.

आकडेवारी 

– वर्षभरात पुणेकांरांनी 170.75 लाख लिटर बिअर फस्त केली.

– 157.97 लाख लिटर बिअर उपनगरीय मुंबईकर प्यायलेत

– 146.66 लाख लिटर बीअर उपनगरीय मुंबईकर प्यायलेत तर सर्वात कमी बिअर फक्त 3.78 लाख लिटर बिअर     हिंगोलीकर प्यायलेत.

– 7.59 लाख लिटर वाईन पुणेकर प्यायलेत

– 7.20 लाख लिटर वाईन उपनगरीय मुंबईकर प्यायलेत

– सर्वात कमी वाईन म्हणजे 0.05 लाख लिटर वाईन गोंदिया आणि हिंगोलीकर प्यायलेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.