Pune : अश्लील फोटो व्हायरल करायची धमकी देत महिलेवर अत्याचार प्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज- शारीरिक संबधाचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी याच्या विरोधात एका पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्याबरोबर मोकाच्या गुन्ह्यात देखील सुधीर कर्नाटकी आरोपी होता.

पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुधीर कर्नाटकी याने तिला लग्नाचे लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. शारीरिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुधीर कर्नाटकी देत होता. तसेच त्याने या चित्रफितीच्या आधारे पीडीत महिलेच्या काही कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या देखील घेतल्या असल्याचे पीडीत महिलेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

सुधीर कर्नाटकी पुण्यातील प्रसिद्ध बाधंकाम व्यवसायिक असून पुण्याचे माजी उप महापौर दीपक मानकर यांच्याबरोबर मोकाच्या गुन्ह्यात देखील कर्नाटकी आरोपी होता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.