Pune : ग्रंथालयांनी वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल सादर करावेत

एमपीसी न्यूज – शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या कामकाजावर आधारित वार्षिक अहवाल 30 जूनपर्यंत व लेखा परीक्षण अहवाल 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. दे. संगेपाग (Pune) यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांचे मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल व सनदी लेखापालांनी केलेले लेखा परीक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे येथे सादर करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Maharashtra : आता उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकऊ नये – एकनाथ शिंदे

दिलेल्या मुदतीत वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्यास परीक्षण अनुदान वितरीत करण्यात येणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयाची राहणार असल्याचेही संगेपाग यांनी (Pune)सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.