Pune : ऑगस्टपर्यंत शास्तीकर माफ करावा : जगदीश मुळीक

Punish Shastikar till August: Jagdish Mulik

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात करदात्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मिळकतकरावरील शास्तीकर या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत आकारण्यात येऊ नये, अशी मागणी  भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना केली आहे.

तसेच आर्थिक वर्षात मे महिन्या अखेरपर्यंत मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांना पुणे महापालिकेच्या वतीने मिळकतकराच्या ५ – १०% सवलत दिली जाते. यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुणे शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे.

त्यामुळे मिळकतकर भरू इच्छिणाऱ्या अनेक करदात्यांना निर्धारीत सवलतीच्या मुदतीत तो भरता आलेला नाही. त्यामुळे ही सवलतीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तर, मिळकत कर भरण्यासाठी ३१ मे शेवटचा दिवस असल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत ३० जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. यासाठीची स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.