_MPC_DIR_MPU_III

Pune : भाजप महिला आघाडीचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांसोबत रक्षाबंधन

v : Rakshabandhan with BJP women's front police, health workers, doctors

एमपीसी न्यूज – ‘कोविड 19’ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. या काळात आपले कुटुंब, आपला सगळा वेळ आणि वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिका आरोग्य निरीक्षक, मुकादम, डाॅक्टर व अन्य सेवाभावी संस्थांचे सदस्य आदींना रक्षाबंधना निमित्त भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

तसेच, या कोरोना योद्धयांचा यथोचित सन्मानही केला. महापालिका स्वीकृत सभासद सचिन दांगट यांच्या नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरात हा उपक्रम सोमवारी यशस्वी झाला.

या कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे प्रकाश आळंदकर, वारजे – माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, पोलीस कर्मचारी, वारजे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, वाहतूक कर्मचारी, पुणे महापालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत, सचिन सावंत, मुकादम संतोष बराटे, रेणुका मोरे, वर्षा पवार, रेश्मा दोशी, सुप्रिया निंबाळकर, अमजद अन्सारी, किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.