PDFA LEAGUE : महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

एमपीसी न्यूज – पीडीएफए (PDFA LEAGUE)  महिला लीगच्या सुपर सिक्स गटात पुणेरी वॉरियर्सने विजती सलामी दिली. त्यांनी सिटी गर्ल्स गो स्पोर्टसचा 2-0 असा पराभव केला. एसएसपीएमएस मैदानावर महिला लीगमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात केवळ हाच एकमेव सामना निकाली ठरला. बाकी सर्व सामने अनिर्णित राहिले.

पुणेरी वॉरियर्सकडून दोन्ही सत्रात एकेक गोल करण्यात आला. प्रथम 10 व्या मिनिटाला ऐश्वर्या जगताप हिने गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात सामन्याच्या 57 व्या मिनिटाला किर्ती गोडवीने दुसरा गोल केला.

Pimpri Corona Update : शहरात आज 106 नवीन रुग्णांची नोंद, 59 जणांना डिस्चार्ज

अन्य सामन्यात स्निग्मय एफसीला डेक्कन इलेव्हनने 1-1 असे बरोबरीत रोखले. दोन्ही गोल उत्तरार्धात नोंदवले गेल. सामन्याच्या 57 व्या मिनिटाला निधी वर्मा हिने पहिला गोल केला. त्यानंतर तीनच मिनिटांनी कल्याणी देसळे हिने गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

अस्पायर एफसी आणि उत्कर्ष क्रीडा मंच अ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

Uddhav Thackeray : होय… संघर्ष करणार; मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर संजय राऊतांचा एल्गार

निकाल –

एसएसपीएमएस मैदान (महिला लिग) (PDFA LEAGUE)
डेक्कन इलेव्हन 1 (कल्याणी देसळे 60वे मिनिट) बरोबरी वि. स्निग्मय एफसी 1 (निधी वर्मा 57वे मिनिट)
पुणेरी वॉरियर्स 2 (ऐश्वर्या जगताप 10वे मिनिट, किर्ती गोडावी 57वे मिनिट) वि.वि. सिटी गर्ल्स गो स्पोर्टस 0
अस्पायर एफसी 0 बरोबरी वि. उत्कर्ष क्रीडा मंच अ 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.