Pune : पुणेकरांचा वेग 18 किलोमीटर प्रति तास 

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वाहनांची सरासरी गती ३० किलोमीटर प्रति तास अपेक्षित आहे. मात्र, पुणे शहरातील रस्त्यांवरून धावणार्‍या वाहनांची सरासरी गती १८ किलोमीटर परिणामी रस्त्यावरील वाहने कासवगतीने धावताना दिसत असून शहरातील वाहतुकीला सामावून घेण्यासाठी रस्तेच अपुरे पडत आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून समोर आले आहे. 

राज्यात सर्वाधिक वेगाने विस्तारणार्‍या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. मात्र, शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याने खासगी वाहनांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. मात्र, वाहतुकीच्या वाढत्या आलेखाला सामावून घेण्यासाठी शहरातील रस्त्यांचा आकार तोकडा पडत आहे. रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण आणि रस्त्यांची क्षमता यांचे गुणोत्तर ०.८ इतके अपेक्षित आहे. मात्र, खासगी वाहनांच्या भरमसाठ संख्येमुळे हे गुणोत्तर सध्या १.४ इतके झाले आहे. परिणामी रस्त्यावरील वाहतुकीची गती कमी झाली असून पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहाला तोंड द्यावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.