Pune News : शरद पवारांच्या सुचनेनंतर पुण्यातील ‘वशाटोत्सव’ अखेर रद्द

0

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आयोजित करण्यात आलेला वशाटोत्सवचा नियोजित कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलेला आहे. आज (20 फेब्रुवारी) हा कार्यक्रम होणार होता, मात्र पुण्यातील कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येनंतर अखेर रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. शरद पवारांच्या सुचनेनंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.

गेली अनेक वर्षांपासून पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र यंदा यावर कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे प्रमुख नेते उपस्थित राहणार होते.

एकीकडे शिवजयंतीवर निर्बंध घालण्यात आले, तर दुसरीकडे वशाटोत्सवाला परवानगी कशी ? असा सवाल विचारला जात होता. अखेर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकीकडे शिवजयंती असूनही सर्वसामान्य नागरिकांना शिवजयंतीचा उत्सव साजरा करू नये म्हणून राज्य सरकार बंदी घालते आणि दुसरीकडे त्यांच्या सरकारचे 5 मंत्री आणि आणखी शरद पवार किमान हजारभर लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांना एक नियम आणि सर्वसामान्य नागरिकांना एक नियम आहे का ?, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.