Pune : प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्योग, कारखाने सुरू करा; जिल्हाधिकारी राम यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचाऱ्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.

उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगावे. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.