Pune : अभियांत्रिकी आणि इतर प्रवेशासाठी आवश्यक ‘राज्य सामाईक प्रवेश’ परीक्षा तालुका स्तरावर घ्या – भाजपा विद्यार्थी आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘राज्य सामाईक प्रवेश’ परीक्षा तालुका स्तरावर घ्यावी , अशी मागणी पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी केली आहे.

उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार,शालेय शिक्षण मंञी वर्षा गायकवाड,उच्च शिक्षण मंञी उदय सामंत यांच्याकडे ई-मेल द्वारे मागणी करण्यात आली आहे.

चव्हाण म्हणाले, कोरोना विषाणूमुळे देशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आजाराचा प्रादुर्भाव वाढणार असेल तर येणाऱ्या काळातील CET या सारख्या परीक्षेसाठी ठोस उपयोजना करणे गरजेची आहे. राज्यातील असंख्य विद्यार्थी दरवर्षी प्रवेश परीक्षा देत असतात, त्यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात.

सध्या राज्यात ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची संख्या ही कमी आहे व सध्या या विषाणूच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी जर शहरात परीक्षेसाठी गेले तर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ह्या तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न करण्याची अशी मागणी संस्कार चव्हाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.