Pune : शरद पवारांच्या मुलाखतीला ‘एक शरद….सगळे गारद’ हे शीर्षक समर्पकच – छगन भुजबळ
The title 'Ek Sharad .... Sagale Garad' is apt for Sharad Pawar's interview - Chhagan Bhujbal :

एमपीसी न्यूज : शरद पवारांनी राजकारणात भल्याभल्यांना गारद केले. त्यामुळे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीला ‘एक शरद… सर्व गारद’ हे शीर्षक समर्पकच असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.
मंत्री भुजबळ एका बैठकीसाठी पुण्यात आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेऊन एक शरद सगळे गारद असे शीर्षक देत त्याचा टिझर सोशल मीडियावर टाकला होता.
राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवारांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सर्वांना या मुलाखतीची उत्सुकता आहे.

मात्र, असे असले तरीही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांनी मात्र या मुलाखतीवरून शिवसेनेवर टीका केली.
सगळेच गारद असतील तर शिवसेना ही गरज आहे का, असा तिरकस सवाल विचारत त्यांनी राऊत यांची मुलाखत घेऊन ‘एक नारद शिवसेना गारद’ असे शीर्षक द्यावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिके संदर्भात विचारले असता भुजबळ म्हणाले, पवारांनी आजवर राजकारणात सर्वांना गारद केले आहे. त्यामुळे या मुलाखतीला दिलेलं शीर्षक समर्पक आहे.