Wakad News: अनधिकृत पोस्टरबाजी करणाऱ्या पॅथॉलाजी लॅबवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात महापालिकेच्या मिळकतीवर अनधिकृत पोस्टरबाजी करणा-या द पॅथॉलाजी लॅबवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, नगरसेविका ममता गायकवाड यांच्याआदेशानुसार आरोग्य विभागाने कारवाई केली. 25 हजार रुपये दंड वसूल केला.

वाकड परिसरात अनधिकृत फ्लेक्स संदर्भात नगरसेविका ममता गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत पत्राद्वारे आयुक्तांना कळविले होते. अनधिकृत फ्लेक्स, केबल्स, स्टिकर, पोस्टरबाजी संदर्भात नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती त्याअनुषंगाने नगरसेविका गायकवाड यांनी पुढाकार घेऊन स्टिकर लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या संबंधित विभागास दिल्या आहेत.

वाकड परिसरात द पॅथॉलाजी लॅबने अनधिकृत पोस्टरबाजी महापालिकेच्या मिळकतींवर केलेली होती. त्या अनुषंगाने संबंधित लॅबवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना गायकवाड यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागास दिल्या.

ममता गायकवाड म्हणाल्या की, “परिसर विद्रुपीकरण करणाऱ्या संबंधित पॅथॉलाजी लॅबने अनधिकृत पोस्टरबाजी करून विद्रुपीकरण केलेले होते. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे. अनधिकृत फ्लेक्स, स्टिकर, होर्डिंग, पोस्टरबाजी संदर्भात येत्या काळात कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई व पोलीस कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.