Thergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ कार्यालय प्रभाग क्रमांक 24 मधील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये दोन किलो प्लास्टिक सापडले. त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने 23 मार्च 2018 पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक अविघटनशील असल्यामुळे राज्य सरकारने प्लास्टीकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर 23 मार्च 2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर करणा-यांवर पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.

‘ग’ कार्यालय प्रभाग क्रमांक 24 मधील वाकड रोड येथील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये दोन किलो प्लास्टिक सापडले. त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.  सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, कर्मचारी अभय दारोळे,  प्रशांत पवार, अरुण राऊत, अनिल डोंगरे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.