Pimpri News : ताटातूट झालेल्या माय-लेकरांची अशी झाली पुनर्भेट 

एमपीसी न्यूज – आईच्या प्रेमाला अनेक कवींनी वेगवेगळी उपमा दिली आहे. आपल्या लेकरांसाठी तिचा जीव नेहमी खालीवर होत असतो. प्राण्यांच्या बाबतीत देखील हे तितकंच खरं आहे. चिखली-स्पाईन रस्त्यावर अशीच एक घटना घडली. त्रास होत असल्याने एका महिलेने कुत्रीची चार पिल्ले दूरवर नेऊन सोडली‌, आणि आईची आपल्या लेकरापासून ताटातूट केली. याबाबतची माहिती पिपल फॉर अॅनिमल्स या संस्थेला मिळाली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन केले व ताटातूट झालेल्या माय-लेकरांची पुनर्भेट घडवून आणली. 

चिखली-स्पाईन रस्त्या येथील बाळासाहेब बच्चे नावाचे सद्गृहस्थ आपल्या भूतदयेतून घराजवळील काही कुत्र्यांना नेहमी खायला घलायचे. त्यापैकी एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. बच्चे कुत्र्यांना नेहमी खाऊ घालायचे काम चोख करतच होते त्याला आता वात्सल्याची जोड मिळाली.

एक दिवस असे घडले की, बच्चे यांच्या शेजारी राहणा-या एका महिलेला त्या लहान पिल्लांचा त्रास हाेऊ लागला व तिने या विषयवरून वाद घातला. एवढं करून न थांबता सदर महिलेनी त्या पिल्लांना आपल्या आईपासून दूर केले.

बच्चे यांच्या ताबडतोब ही गोष्ट लक्षात आली. वारंवार त्या महिलेस त्याबद्दल विचारणा केली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर शेवटचा पर्याय म्हणून पंकज यांच्या मदतीने बच्चे यांनी तिची तक्रार ‘पीएफए’ला केली.

संस्थेच्या कार्यकर्त्यानी महिलेचं घर गाठून पिल्लांबद्दल विचारणा केली. सुरुवातीला महिलेनं असहकार करत उडवाउडवीची उत्तरे दिली. संस्थेच्या सदस्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबत महिलेच्या मातृत्वाला साद घातली.

आपली चूक लक्षात घेऊन महिलेनं 26 नाेव्हेंबर राेजी स्वतः सोडलेल्या ठिकाणी जाऊन त्या पिल्लांचा शोध घेतला आणि त्यांना परत सुखरूप आणून पीएफए’च्या कार्यकर्त्यांना आणून दिले.

अशा प्रकारे ताटाटूट झालेल्या माय लेकाराची ‘पीएफए’ने पुनर्भेट घडवून आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.