Pimpri News: श्वान संतती नियमन केंद्रासाठी निर्जंतुकीकरण साहित्य खरेदी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका पशुवैद्यकीय विभागातील श्वानसंतती नियमन शस्त्रक्रीया केंद्रासाठी निर्जंतुकीकरण साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 35 लाख रूपये खर्च होणार आहे.

महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या मागणीनुसार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तातडीने आवश्यक श्वानसंतती नियमन शस्त्रक्रीया केंद्रासाठी निर्जंतुकीकरण साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन निविदा दर मागविण्यात आले. त्यामध्ये तीन निविदाधारकांनी दर सादर केले.

त्यापैकी मुंबईतील इनोव्हेटीव क्लिनिंग सिस्टीम यांनी एकूण पाच बाबींसाठी 0.46 टक्के कमी दर सादर केला. त्यांच्याकडून 35 लाख 72  हजार रूपये असा लघुत्तम दर प्राप्त झाला. त्यानुसार, श्वानसंतती नियमन शस्त्रक्रीया केंद्रासाठी इनोव्हेटीव क्लिनिंग सिस्टीम यांच्याकडून निर्जंतुकीकरण साहित्य खरेदी केले जाणार आहे. त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.