Pune News : पुणे शहरात नवीन वाहनांच्या खरेदीत 39 टक्क्यांची घट 

एमपीसी न्यूज : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील खासगी विशेष करून दुचाकी आणि कार वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. 2019 च्या तुलनेत नवीन वाहनांमध्ये तब्बल 39 टक्के घट झाली आहे. महापालिकेच्या 20/ 21 च्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. शहरात गेल्या तीन वर्षांपासून नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. शहरात दुचाकी वाहनांच्या खरेदीतही घट झाली आहे.

शहरात 2020 मध्ये केवळ 1 लाख 51 हजार 16 नवीन वाहनांची नोंद झाली आहे. 2019च्या तुलनेत नवीन वाहनांमध्ये तब्बल 39 टक्के घट झाली आहे. 2020 च्या जानेवारी तेडिसेंबर दरम्यान शहरात 13 हजार 950 नवीन सीएनजी वाहनांची नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत एकूण 2 हजार 431 सार्वजनिक बसेस असून, त्यापैकी 1 हजार 759 सीएनजी आहेत. अंदाजे 70 टक्के बसेस या सीएनजीचा वापर करीत आहेत. सध्या 150 ई-बसेस कार्यरत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.