Purna nagar power supply : पूर्णा नगर व आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : पूर्णा नगर व आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा दररोज खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. (Purna nagar power supply) गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून येथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे महावितरणने येथील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पूर्णा नगर विकास कृती समितीने केली आहे.

पुर्णा नगर, शिवतेज नगर व शाहूनगर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार गेले 6 ते 7 महिने होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. (Purna nagar power supply) याविषयी माहिती देताना विकास गर्ग, अध्यक्ष, पूर्णा नगर विकास कृती समिती म्हणाले की, पुर्णा नगर, शिवतेज नगर व शाहूनगर परिसरातील विजपूरवठा दिवसातील 4 ते 5 तास खंडित होत असतो. विद्युत पुरवठा सकाळी 8:00 वा. ते रात्री 8:00 या कालावधीत कधीही खंडीत होतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, गृहिणींना व इतरांना याचा त्रास होतो. अंदाजे 20,000 ते 30,000 नागरिकांना या विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास होत असतो.

Mother Safe Campaign : शहरात ‘माता सुरक्षित’ अभियान  

या परिसरातील नागरिकांनी महावितरणांकडे वारंवार याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे महावितरणने येथील समस्या सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे.(Purna nagar power supply) जर पूर्णा नगर व शिवतेज नगर येथील वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर पुर्णा नगर, शिवतेजनगर व  शाहूनगर या परिसरातील नागरिक महावितरणच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.