Purnanagar News : पूर्णानगर येथे भाजी विक्रेत्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

एमपीसीन्यूज : पूर्णानगर कृती समितीच्यावतीने पूर्णानगर येथील भाजी विक्रेते, सोसायटी वॉचमन आणि सामान्य नागरिकना मोफत सॅनिटायझर, फेस शिल्ड, अर्सनीक अल्बम 30 गोळ्या व मास्क वाटप करण्यात आले.

समितीचे अध्यक्ष विकास गर्ग यांच्यासह सुनील कदम, शिवसेनेचे शैलेश मोरे, श्रीकांत करोली, नितिन जगताप, विनोद रोकडे आणि राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवडसह राज्यभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्यसरकडून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तरीही काही नागरिक मास्क वापरत नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पूर्णानगर कृती समितीच्या वतीने पूर्णानगर परिसरातील भाजी विक्रेते, सोसायटी वॉचमन आणि सामान्य नागरिकना मोफत सॅनिटायझर, फेस शिल्ड, अर्सनीक अल्बम 30 गोळ्या व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.