Pimpri News : अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्याला एका भाजी विक्रेत्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करत भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी पावणे दहा वाजता जयहिंद स्कूल पिंपरी येथे घडली.

अरुण मसा अवधुते (वय 35, रा. संजयगांधी नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे मुगुटराव विष्णू सावंत (वय 58) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते त्यांच्या पथकासोबत पिंपरी येथील जयहिंद स्कूल समोर फूटपाथवर अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी भाजी विक्रेत्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.